ताज्या घडामोडी

विधानसभेचा गड ताब्यात घेण्यासाठी जवळगावकरांना विजयी करा – फेरोज खूरेशी

विधानसभेचा गड ताब्यात घेण्यासाठी जवळगावकरांना विजयी करा – फेरोज खूरेशी

प्रतिनिधी :- हिमायतनगर

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हदगाव/ हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी व जनतेच्या प्रश्नांची जाणीव असलेला नेता विधानसभेत पाठवण्यासाठी माधवराव पाटील जवळगावकर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काँग्रेस अल्पसंख्याक च्या तालूका अध्यक्ष फेरोज खूरेशी यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघाचा रेकॉर्ड ब्रेक विकास करणाऱ्या उमद्या नेतृत्वास पुन्हा एकदा हदगाव /हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील जनतेने संधी देऊन शिल्लक असलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी माधवराव पाटील जवळगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मतदान करण्याचे आव्हानही फेरोज खूरेशी यांनी केलेआहे.
हदगाव/ हिमायतनगर या दोन्ही तालुक्यात जवळगावकर यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत ठेवण्यासाठी व महाराष्ट्र राज्याच्या भल्यासाठी नांदेड चे भूमिपुत्र अशोकराव चव्हाण यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बसवण्यासाठी त्याबरोबरच अल्पसंख्याक च्या प्रश्र व शेतकरी कष्टकरी व निराधार मजुरांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शहर व तालूका भागासह वाडी तांड्यातील जनतेने माधवराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात त्यांना निवडून देण्याचे आव्हान हिमायतनगर काँग्रेस अल्पसंख्याक चे तालूका अध्यक्ष फेरोज खूरेशी यांनी जनतेला केले आहे.

प्रतिनिधी :- शेख चाँद शेख तैयब

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *