बिटरगाव पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन गुन्हे दाखल, हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकटे
बिटरगाव पोलीस स्टेशन आंतर्गत अवैध दारूविक्री आणि हातभट्टी व्यवसायाने डोके वर काढले असतानाच, बिटरगाव पोलिसांनी आज धडक मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक कारवाईत एकूण ३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी हजारो रुपयांचा मोहाचा सडवा आणि गावठी दारू जागच्या जागीच नष्ट केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. यामध्ये खालील आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत: रंजना किसन मुडे (वय ४५ वर्ष, रा. भोजनगर, ता. उमरखेड)गुन्हा नोंद: गु.र.क्र. १२०/२६, कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा (मदाका).जप्त मुद्देमाल: २०० लिटर मोहमास सडवा आणि ४० लिटर गावठी दारू (अंदाजे किंमत १४,०००/- रुपये, घटनास्थळी नष्ट), रमेश थावरा चव्हाण (वय ३८ वर्ष, रा. मेट, ता. उमरखेड)गुन्हा नोंद: गु.र.क्र. १२१/२६, कलम ६५ (ई) मदाका.जप्त मुद्देमाल: ३०० लिटर मोहमास सडवा आणि ४० लिटर गावठी दारू (अंदाजे किंमत १९,०००/- रुपये, घटनास्थळी नष्ट). किसन रोडा राठोड (वय ५० वर्ष, रा. नारळीतांडा, ता. उमरखेड)गुन्हा नोंद: गु.र.क्र. १२२/२६, कलम ६५ (ई) मदाका.जप्त मुद्देमाल: ५० लिटर मोहमास सडवा आणि २० लिटर गावठी दारू (अंदाजे किंमत ४,५००/- रुपये, घटनास्थळी नष्ट).ठाणेदारांचा अवैध धंद्यांविरुद्ध कडक इशारा बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी पदभार घेतल्यापासून अवैध धंद्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज झालेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहेत. परिसरात कुठेही अवैध दारूची निर्मिती किंवा विक्री होत असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा ठाणेदार शिंदे यांनी दिला आहे.या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या ‘अॅक्शन मोड’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.सदर ची कार्यवाही मा. कुमार चिंता पोलीस अधिक्षक, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा.हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड याचे मार्गदर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोउपनी सागर अन्नमावर पोहेका रवी गिते पोका हिंमत जाधव, सुदर्शन जाधव, प्रवीण जाधव, आंबादास गारुळे, इम्रान खान, प्रकाश केंद्रे, दत्ता कवडेकर, यांनी केली




