ढाणकी // सन-रेज इंग्लिश मिडीयम स्कुल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
ढाणकी / प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे
उमरखेड येथील सनरेज इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताकदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे ध्वजारोहण माननीय इनायत उल्ला जनाब यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेचे अध्यक्ष माननीय ॲड.वसीम अहेमद सर यांची पुसद नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच रसुलभाई पटेल आणि डॉ.अनिल काळबांडे यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. यामध्ये नाटीका, देशभक्ती गीत इत्यादी कार्यक्रमांनी पालकांचे लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्यात शाळेचे अध्यक्ष अँड वसीम अहेमद तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय इनायत उल्ला जनाब , डॉ. अनिल काळबांडे, श्री. बोपीनवार (ए.पी.आय.उमरखेड पोलीस स्टेशन ) शाळेचे उपाध्यक्ष श्री अविनाश पोंगाणे , शाळा सल्लागार समितीचे सदस्य श्री.राम बोकण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण, क्रीडास्पर्धेत प्राविण्य प्राप्त, नॅशनल व इंटरनॅशनल लेवल रंगोत्सव स्पर्धेत गोल्ड मेडल ,सिल्वर मेडल ,ट्रॉफी व प्रोत्साहन पर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सनरेज इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष ॲड वसीम अहमद यांनी इतरांसाठी आपण काय करू शकतो असा विचार करून शैक्षणिक संस्था उभारून अनेक शाळा सुरू केल्या त्यापैकी एक सनरेज इंग्लिश मीडियम स्कूल आहे.इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा उद्देश हे आपल्या शाळेत गोरगरिबांची मुले शिक्षण घेऊन उच्च पदावर जातील व तसेच अनेक तरुणांना रोजगार मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेची स्थापना करण्यात आली. तसेच दरवर्षी या शाळेत ५० विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण दिल्या जाते.तसेच इनायत उल्ला जनाब साहेब आणि रसुलभाई पटेल यांनी आपल्या भाषणातुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापिका उमा शिंदे, मुख्याध्यापक श्री बबन खसावत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपुर्वा साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश लक्ष्मणराव वानखेडे यांनी मानले




