ताज्या घडामोडी

ढाणकीत ३० वर्षांची परंपरा कायम; भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन.

ढाणकीत ३० वर्षांची परंपरा कायम; भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन.

​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद शिकाटे

येथील विठ्ठल रुक्माई वारकरी मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने ११ ते १८ जानेवारी २०२६ या काळात भव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३० वर्षांपासून ढाणकीकरांनी ही भक्तीची परंपरा जपली आहे.

​यावर्षी वाशिमचे प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. नामदेव महाराज काकडे यांच्या रसाळ वाणीतून भागवत कथा रंगणार आहे, तर ह.भ.प. रामदास महाराज ठाकरवाडीकर व्यासपीठ चालक म्हणून जबाबदारी सांभाळतील. सप्ताहात शरद आंबेकर महाराज, महेंद्र महाराज मस्के, रामेश्वर महाराज कुबेर यांसह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार असून, समारोप नारायण महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. ढाणकी शहरात यानिमित्ताने ‘भक्तीचा जागर’ होणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *