क्राईम डायरी

माहूर : महादापुर च्या नाल्यातून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला.

माहूर : महादापुर च्या नाल्यातून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला.

 

नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर

 

 

महादापुर च्या नाल्यातून ईवळेश्वर कडे वाळू भरून

नेत असताना पोलिसांनी नाल्यातच रंगेहात पकडले

तालुक्यातील मौजे महादापूर येथील पैनगंगा नदीला जोडलेल्या नाल्यातून वाळू भरून ईवळेश्वर कडे नेण्याच्या तयारीत नदीपात्रात उभा असलेल्या ट्रॅक्टरला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांचे सह पोलिसांनी जाय मोक्यावर पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केल्याची घटना दि 12 रोजी दुपारी 10.40 वाजता घडली आहे

 

पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी संदीप अन्येबोईनवाड जमादार पो ना प्रकाश गेडाम पोका ज्ञानेश्वर खंदाडे पो का संघरत्न सोनसळे गोपनीय शाखेचे गजानन जाधव हे तपास कामी महादापूर वरून पुढे जात असताना त्यांना नाल्यातून वाळू भरून नेत असताना ट्रॅक्टर दिसल्याने त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने ट्राली नाल्यातच सोडून ट्रॅक्टरचे मुंडके घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्यास रंगे हात पकडून माहूरच्या पोलीस ठाण्यात आणून जप्त करत गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे वाळू तस्करात दहशत पसरली असून कुठल्याही प्रकारची चोरी खपवून घेणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी दिला आहे.

 

घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांचे सह पोलीस करत असून वाळू तस्कर सततच्या पावसाचा फायदा घेत नाल्यातून वाळू तस्करीकरण्याच्या प्रयत्नात असल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दोन्ही वाहनाद्वारे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावात रात्रंदिवस पेट्रोलिंग वाढविली आहे

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *