जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासमोर मांडल्या आरोग्य केंद्राच्या समस्या
प्रतिनिधी मिलिंद चिकाटे
तालुक्याच्या बंदी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे बऱ्याच वार्डात छत गळती होत असून त्यामूळे रुग्णांना असुविधा होत असून रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदच्या थेरडी येथील कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या आहेत.
शासनाकडून गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व योजने अंतर्गत प्रसूती झालेल्या महिलांना वर्ष 2021-2022 व 2023 मध्ये कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसून त्या लाभाची रक्कम लाभार्थ्यांना त्वरित मिळवून द्यावी व गरोदर महिलांना व प्रसूती महिलांसाठी घेण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये योग्य पोषण आहार मिळत नसल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे काही दिवसांनी प्रत्यक्ष भेट देऊ असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले.




