भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांची पूरग्रस्त गावांना भेट.
उमरखेड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन नदीकाठची गावे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले बघायला मिळत आहे.
यावेळी स्थानिक विविध गावांतील पूरग्रस्त भागांत प्रत्यक्ष नदीकाठावर आणि गोर गरीबांच्या झोपडीत जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचे काम भारत मुक्ती मोर्चाचे विद्वानभाऊ केवटे यांनी केले.
शासन प्रशासनाने आता कुठल्याही प्रकारच्या पंचनाम्यांची औपचारिकता न करता थेट शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ द्यावा.अन्यथ वेळ पडल्यास शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारणार.”
अशी प्रतिक्रिया यावेळी दिली.
यावेळी भारत मुक्ती मोर्चा च्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.




