पूरग्रस्त प्रवाशांना एम आय एम चे माहुर तालुका अध्यक्ष शेख सज्जाद यांचा मदतीचा हात…!

नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर
सज्जाद यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण केले सादर..!
माहूर तालुका व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला पूर आला असून नदीवरील धानोडा पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेमुळे मराठवाडा–विदर्भ दळणवळण तुटून शेकडो भाविक भक्त व प्रवासी पुलावरच अडकून पडले. अनेकांना रात्रीपासून उपाशीपोटीच थांबावे लागल्याने लहान मुलं, महिला, वृद्ध प्रवासी यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
या गंभीर परिस्थितीची महिती मिळताच एमआयएम तालुकाध्यक्ष सज्जाद शेख (सज्जाद भाऊ) यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला.त्यानंतर तातडीने पुलावर अडकलेल्या प्रवाशांना फळांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे उपासमार सहन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला. प्रवाशांनी सज्जाद भाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार मानले.
या वेळी शहजाद नवाब, आरसलान शेख, कयुम शेख, अय्युब शेख, अजीज शेख, शोहेब शेख, सलीम शेख, शैजाद, नवाब, अर्शद शेख, शाहिद लाला तसेच सज्जाद भाऊ मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मदतकार्याची ही बातमी संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.


