भाजपा युवा मोर्चाच्या पुसद जिल्हाध्यक्षपदी रोहित वर्मा यांची वर्णी.
उमरखेड ढाणकी । प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.

भाजपा यवतमाळ वाशिम जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनात, भाजपा पुसद जिल्हाध्यक्षा सौ. आरतीताई फुफाटे यांच्या नेतृत्वात नुकतीच भाजपची पुसद जिल्हा कार्यकारीणी व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद घोषित करण्यात आले.
यात ढाणकीचे भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री रोहित विष्णुदास वर्मा यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
माणुसकी जपुन ठेवणारा राजकारणी म्हणून रोहित वर्मा यांना जिल्ह्यात सर्वदूर ओळखल्या जाते.
राजकारणात येणं सोपं असतं, पण माणुसकी जपत पुढं जाणं ही खरी ताकद असते. रोहित वर्मा यांनी एक साधा भाजपा कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली, पण त्यांची खरी ओळख त्यांच्या माणुसकीच्या वागणुकीतून आणि जनसेवेच्या वृत्तीमधून निर्माण झाली. समाजाच्या प्रत्येक थराशी जोडले गेलेले, सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकणारे आणि त्यावर कृती करणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली आहे.
आज भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड ही फक्त त्यांच्या राजकीय प्रवासाची पायरी नाही, तर तरुणांमध्ये नेतृत्व कसं असावं याचा आदर्श ठरावा अशी निवड आहे.त्यांचा प्रवास सांगतो, पद हे मोठं नसतं, कर्तृत्व आणि विचारांनी ते मोठं केलं जातं.
राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून, लोकसेवेसाठी असावं हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं.कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी, तरुणांशी नातं,माणुसकीचा स्पर्श हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे.आपल्या भागात परिवर्तन घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आणि प्रत्येक माणसात माणूस पाहणाऱ्या रोहित वर्मा यांच्या नियुक्तीने ढाणकीसह समस्त पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे. त्यांना मिळालेल्या पदाला ते योग्य न्याय तर देतीलचं, परंतु त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्या पदाचा मान अजून वाढणार असा विश्वास ढाणकीकर व्यक्त करताना दिसत आहेत.महेश पिंपरवार यांची भाजप पुसद जिल्हा सचिव पदी नियुक्ती.ढाणकी भाजपचे माजी शहराध्यक्ष महेश पिंपरवार यांची सुद्धा भाजपा पुसद जिल्ह्याच्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.


