ताज्या घडामोडी

राजस्व मंडळ ढाणकी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

राजस्व मंडळ ढाणकी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे

आज दिनांक 24 जुलै रोजी राजस्व मंडळ ढाणकी (तलाठी कार्यालय) येथे राजस्व मंडळ ढाणकी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले.

 

या शिबिरास गावातील व खेड्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन निराधार योजना,उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जातीचा दाखला,आधार अपडेशन, अग्रीस्टेन्ग नोंदणी सेवेचा राजस्व ढाणकी मंडळ यांचे कडून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला.

या वेळी प्रमुख पाऊणे म्हणून ढाणकी नगरपंचायत माजी नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल,माजी नगर उपअध्यक्ष जहीर भाई, बिटरगाव पो. स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस पाटील रमण रावते वआनंदराव चंद्रे उपस्थित होते.

तसेच स्थानिक पातळीवरील ढाणकी मंडळ अधिकारी आढाव,ढाणकी खंड 1 चे तलाठी भंडारे,ढाणकी खंड 2 चे तलाठी जगताप, गांजेगाव तलाठी शिंदे,कृष्णापूर तलाठी इंगळे,सोईट(म ) राहूल भोजने, कोप्रा तलाठी पावडे व महसुल सेवक सैयद इबाद्दूला, अभिलास गायकवाड,आंनद पैठणकर,

संघ प्रिया वाघमार भारत सूर्यवंशी मान्यवर ग्रामस्थांच्या सेवेसाठी उपस्थित होते.

या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ, तहसीलदार उमरखेड, मंडल अधिकारी, व सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचे नागरिकांनी अभिनंदन केले.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *