ताज्या घडामोडी

किनवट/माहूर,जनतेचे खरे सेवक – प्रशांत राठोड….! 

किनवट/माहूर,जनतेचे खरे सेवक – प्रशांत राठोड….!

 

माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर

 

प्रशांत राठोड यांचे नाव जरी कानी पडले, तरी मनात एक समाधानाची भावना निर्माण होते. कारण प्रशांत राठोड म्हणजे सेवा, समर्पण आणि संवेदनशील नेतृत्व यांचा एक जिवंत प्रत्यय. मुंबईसारख्या महानगरात सनदी अधिकारी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतानाच,त्यांनी आपल्या जन्मभूमीकडील प्रश्नांकडेही तितक्याच संवेदनशीलतेने तथा गांभीर्याने लक्ष दिले आहे.

 

गाव, तालुका, जिल्ह्यासह प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना, आपल्या गावातील जनतेची पिळवणूक, दुष्काळ, पाण्याची टंचाई, आरोग्य समस्या, तसेच अनाथ मुलींचे विवाह, आणी शिक्षण, यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी अनेक उपक्रम राबवले. प्रशासकीय पदावर असताना केवळ सरकारी कामापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता, प्रत्येक समाजासाठी माणूस म्हणून काय करता येईल, याचा प्रत्यय त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

 

प्रशांत राठोड हे गरिबांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व आहे. कोणतीही मोठी घोषणा न करता, प्रत्यक्ष कृतीतून मदतीचा हात पुढे करणारे हे व्यक्तिमत्त्व खरोखरच कौतुकास पात्र आहे.

 

अनेक गोरगरीब मुलींच्या लग्नासाठी त्यांनी आर्थिक मदत सुद्धा केली आहे.

 

गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराचा खर्च उचलत, वेळेवर मदत करत त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

 

जनावरांप्रतीही त्यांचे प्रेम दिसून येते. जनावरांची काळजी घेत, त्यांना चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न केले आहे.

 

प्रशांत राठोड यांनी वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे उभारणे,आणी स्वतः भर उन्हात जाऊन त्या कृत्रिम पानवठ्यात पाण्याची पाहणी करणे,दुष्काळी भागात पाणीटंचाई दूर करण्यासाठी विशेष टँकर सेवा राबवणे, हे कार्यही सातत्याने केले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे आज अनेक तांडे, खेडी, गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, जनतेला हिवाळा-उन्हाळा या काळात मोठा दिलासा मिळत आहे.

 

प्रशांत राठोड हे केवळ प्रशासकीय अधिकारी नाहीत, तर एक समर्पित कार्यकर्ता, संवेदनशील समाजसेवक,आणिकिनवट/माहूर तालुक्यातील शहरीभागासह ग्रामीण भागातील जनतेसाठी आधारस्तंभ आहेत. प्रशासकीय अधिकार असतानाही त्यांनी आपल्या मूळ गावाची आणि गावकऱ्यांची साथ सोडली नाही. जन्मभूमीला विसरले नाही.अधिकारी असूनही मातीशी नाळ जोडून ठेवण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे.

 

त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असून, अशा नेतृत्वाची गरज आजच्या समाजाला आहे. समाजासाठी नि:स्वार्थपणे झटणारे, प्रत्येक संकटसमयी मागे न हटता जनतेच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रशांत राठोड यांचं नाव पुढे येत आहे.या मागचे कारण केवळ आत्मिक समाधान मिळत असल्याचे ते आवर्जून सांगतात.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *