ताज्या घडामोडी

उमरखेड / सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गाने आत्ममग्न न राहता पे बॅक टु सोसायटी ची जाणिव ठेवावी.”-विद्वान केवटे.

उमरखेड / सुशिक्षित बुद्धिजीवी वर्गाने आत्ममग्न न राहता पे बॅक टु सोसायटी ची जाणिव ठेवावी.”-विद्वान केवटे.

 

उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे.

फुले,शाहु,आंबेडकरांच्या 108 वर्षांच्या संघर्षातून मूलनिवासी बहुजन समाजात बुद्धिजीवी वर्ग निर्माण झाला परंतु महापुरुषांना अपेक्षित असणारे त्याग समर्पण करताना दिसत नाही.म्हणून समाजात आज बोलक्या नेतृत्वाची नव्हे तर कर्त्या नेतृत्वाची गरज आहे.”

असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे यांनी केले.ते दहागाव येथे आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जयंती तथा महापुरुष सामूहिक प्रतिमा उद्घाटन सोहळ्यानिमीत्त प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.

नवचैतन्य बाल मित्रमंडळ,सम्राट अशोक मंडळ,

तथा बौध्द विहार समिती दहागाव यांच्या द्वारे सामाजिक कार्यकर्ते अत्तदीप धुळे यांच्या नेतृत्वात आयोजित प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.ह्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनरावजी वानखेडे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून

नायब तहसीलदार सुभाषजी पाईकराव, तथा उमरखेड पोलीस स्टेशन चे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन,”डीजेवर नाचण्यापेक्षा अशाच प्रकारे महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करावा.माऱ्याच्या आणि मोक्याच्या जागा काबीज करून आई वडील व देशाचे नाव उज्वल करण्याचे आवाहन केले.यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षता करताना”बहुजन समजाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवन संघर्षातून व रमाईच्या त्यागातून प्रेरणा प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल करावी.”असे मत प्रा.अनिल काळबांडे यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता करताना केले.प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना, “आम्ही दहागाव मध्ये गेल्या काही वर्षांपासून अठरापगड जाती धर्मातील महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करून समाजात एकतेचा संदेश देण्याचे कार्य करतो आहे.”असे मत अत्तदीप धुळे यांनी केले.ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिजाऊ ब्रिगेड च्या सरोजताई देशमुख,देशोन्नती चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण सूर्यवंशी,सेवानिवृत्त स.पो.नी. दीपक कांबळे, रुस्तूमराव कदम,पोलीस पाटील अरविंद शिंदे,भारतीय विद्यार्थी मोर्चा चे साहिल रोकडे हे होते.

 

यावेळी अठरापगड जाती धर्मातील महापुरुषांच्या प्रतिमांचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करून बालकांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

बालक बालिका व गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या हर्षोल्लासात हा कार्यक्रम पार पडला.

ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बौद्ध विहार समिती शिक्षण प्रसारक मंडळाचे बबन मुनेश्र्वर, सदाशिव धुळे,पांडुरंग मूनेश्वर, बालाजी धुळे,काळूराम पंडीत, राजु मुनेश्र्वर,दादाराव मुनेश्वर तथा महिला मंडळ व नवचैतन्य बाल मित्रमंडळाने परिश्रम घेतले.

अठरापगड जाती धर्मातील बहुजनांना एकत्र करणारा ह्या अनोख्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *