माहूर तालुक्यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी 20000 प्रमाणे अनुदान वाटप.
नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होताच माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले तात्काळ अनुदानाचे वाटप….
सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना, व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाचे वितरण डीबीटी द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत पात्र ठरलेल्या प्रकरणातील तिघांच्या वारसांना प्रत्येकी 20000 असे तीन कुटुंबांना एकूण 60 हजाराचे अनुदान देण्यात आलेली माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे.
शासन निर्णय क्रमांक. राकूला २० १२ / प्र. क्र. 277/ विसयो -2, मंत्रालय मुंबई दिनांक 21 नोव्हेंबर 2013 अन्वये दारिद्र्य रेषेखालील नोंद असलेल्या कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कोणतीही कमावती व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबियास राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो.
त्या अनुषंगाने माहूर तहसील कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जानुसार तीन पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी 20, 20 हजाराचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यापैकी (1) गोदावरी संदीप रसाळे , राहणार हडसनी,(2) करुणाबाई वसंत खडके राहणार बोरवाडी (3) सुशीला गंगाराम पेटकुले राहणार सिंदखेड. याप्रकारे एकूण साठ हजाराचे अनुदान पी एफ एम एस प्रणाली द्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे. तसेच माहूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आव्हान केले आहे. या कामी संगायो विभागाचे नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, महसूल सहाय्यक वैभव पांढरे, आयटी असिस्टंट उदय वानखेडे, यांनी अथक परिश्रम घेतले.




