बिटरगाव /पासुन हाके च्या अंतरावर जंगलात त्या गुप्तधनाची झाली वाटणी,
त्या वाटणीत दोन कर्मचारी सुद्धा सहभागी झाल्याची चर्चा?
ढाणकी परिसरात चर्चेला उधान.
ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे.
पौर्णिमेच्या रात्री पैनगंगा अभयारण्य मध्ये पिंपळगाव परिसरात 26 किलो गुप्तधन सापडल्याची चर्चा सध्या ढाणकी परिसरात जोर धरत आहे. गुप्तधन शोधणारी टोळी ही मराठवाड्यातली असल्याचा संशय सध्या व्यक्त होत असून त्या टोळीने पद्धतशीरपणे गुप्तधन काढून वाटून घेतल्याची चर्चा सध्या आहे. पैनगंगा अभयारण्यामध्ये पूर्वी श्यामा कोलाम व विजयकुमार यासारख्या नक्षलवाद्यांचा वावर असल्याने या चर्चेला दुजोरा मिळत आहे. विजयकुमार यांनी लुटीचे सोने अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी गाडून ठेवलेले असल्याने त्याचा शोध गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्या नेहमीच घेतं असतात. याचा पुरावा म्हणून अभयारण्य परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे खड्डे खनल्याची चर्चा सुद्धा आहे. तसेच पौर्णिमेच्या रात्री ह्या टोळ्या अधिक सक्रिय होऊन अभयारण्यातील परिसर नेहमीच खोदत असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत कालच्या प्रकरणांमध्ये 26 किलो सोने सापडलेल्या चर्चेने धनकी परिसरात चांगली चर्चा होत आहे. या प्रकरणांमध्ये दोन खावड कर्मचारी सुद्धा गुंतलेले असून त्यांनी सुद्धा आपला हिस्सा नेल्याची चर्चा काल शहरात चांगलीच रंगत होती. विशेष म्हणजे गुप्तधन सापडलल्या च्या बातमीपासून ते दोन्ही कर्मचारी नागरिकांना दिसेनासे झाले त्यामुळे नक्कीच यामध्ये त्यांचा सुद्धा हात असल्याचे नागरिक बोलत आहेत. काळांतराने हे प्रकरण उजेडात येईलच मात्र या लुटीच्या मालामध्ये हात धुणारे ते दोन कर्मचारी कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे.




