यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
महागांव कृषी केंद्राच्या गोडाऊनवर साठा बोगस खताचा असलेल्या गोडावून कारवाई करा
(जनआंदोलनचे जगदीश नरवाडे यांची विभागीय आयुक्तांकडे मागणी)
महागाव:-
पोट्यास सह बोगस खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कृषि केंद्र विक्रेत्यांवर व बोगस खते, औषधांचा साठा करण्यासाठी या विक्रेत्यांना मदत करणाऱ्या गोडवून मालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
महागाव तालुक्यातील काही कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी
बोगस पोटॅशखतासह इतर निकृष्ट दर्जाचे खते विकण्यासाठी आणुन ती एकापेक्षा अधिक अनाधिकृत गोडावून मध्ये साठवले आहे त्यात एमओपी खतात माती मिश्रित केवळ लाल कलर आहे .शेतकरी बांधवांना शेतात खत नेल्यावर पोत्याचा धागा उसवून मजूर असल्यामुळे शेतात खत टाकणे भाग असते त्यामुळे त्याला तक्रार करायला वेळ नाही त्याची चव घेता येत नाही तो निकृष्ट दर्जाचा आहे की चांगला आहे याची पारख नसल्यामुळे ह्या कंपन्या अल्पावधीत हजारो कोटी रुपयांचा नफा कमवून शेतकऱ्यांना लुटत आहेत ह्या कंपन्यावर वरदहस्त म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय ,जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्या आशीर्वादाने ह्या कंपन्या शेतकऱ्यांची रोज फसवणूक करत आहेत
जिल्ह्यात बोगस निकृष्ट दर्जाच्या खत उत्पादक कंपनीवर दुकानावर कृषी विभागाने मोठी कारवाई केली असे कधी यवतमाळ जिल्ह्यात दिसत नाही
खताच्या दरामध्ये प्रचंड पटीत वाढ झाली पण त्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेले गुणनियंत्रण खातं हे नुसतं खाण्याच्या कामी असल्याने दिसत आहे शेतकऱ्यांना खत बियाण्यासाठीकर्ज काढून निकृष्ट खतामुळे उत्पादन होत नसल्यामुळे आत्महत्या करावा लागत आहे याला जबाबदार कृषी विभाग आहे.त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील सर्व स्तरातील पथक बोलावून जिल्ह्यातील प्रत्येक दुकानातील पेस्टिसाइड व खताचे नमुने घ्यावे तरच या दुकानदारांचे पितळ उघडे पडेल व यामध्ये दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करून त्यांना काळया यादीत टाकण्यात यावे.तेव्हाच शेतकरी हा जिवंत राहील अन्यथा काही दिवसात शेतकरी शेतात पिकत नसल्यामुळे त्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आपण तात्काळ याकडे लक्ष देऊन कृषी विभागाची कान उघडणे करणे आवश्यक असल्याची मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी हा बोगस खत औषधी मुळे फसवणूक होत आहे बांधावर येणारे अधिकारी कर्मचारी सांगणं मताने शेतकऱ्याची फसवणूक करत आहे त्यामुळे उत्पादन झाल्यावर त्याला लागलेला खर्चही निघत नसल्यामुळे घेतलेले कर्ज देण्यासाठी पैसे नसतात पुन्हा शेतीला खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही याला प्रमुख जबाबदार कृषी कार्यालय आहेत काही प्रामाणिक कृषी केंद्र संचालकांनी तालुक्यातील शंभरच्या वर कृषी केंद्र संचालकाकडून पठाणी वसूल करत महागाव साठी दहा हजार पुसद साठी वीस हजार प्रति दुकानाकडून वसूल केले आहेत त्यामुळे निकृष्ट दर्जाचे खत बोगस औषधी या कंपन्याला जिल्ह्यात मोठे मार्केट कृषी विभागाने उपलब्ध करून दिली आहे
कृषी विभागाचा बंदोबस्त केल्याशिवाय शेतकऱ्याची प्रगती होणे कठीण आहे
जगदीश नरवाडे
संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती



