ताज्या घडामोडी

बिटरगाव ठाणेदारांनी चढवली वली कामिल बादशाह मियाँ दर्गा येथे चादर.

बिटरगाव ठाणेदारांनी चढवली वली कामिल बादशाह मियाँ दर्गा येथे चादर.

 

प्रतिनिधी :-ढाणकी मिलिंद चिकाटे

 

उमरखेड तालुक्यातील निंगनुर येथील विदर्भ – मराठवाड्यातील हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या वली कामील बादशाह मियाँ संस्थान येथील उर्स यात्रेनिमित्त दररोज हजारो भाविकांच्या अक्षरशः रांगा लागत आहे . बिटरगाव

ठाणेदार पांडूरंग शिंदे यांनी ताफ्यासह भेट देऊन वली कामील बादशाह मियाँ चरणी श्रद्धापुर्वक चादर चढविली .

दरवर्षी १५ दिवस चालणाऱ्या ऊर्स यात्रेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना विशेषतः महिला भगिनींना त्रास होऊ नये , यात्रेत अवैध धंदे तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी आपल्या ताफ्यासह यात्रेत फेरफटका मारला .यावेळी बीट जमादार रवि गीते, , सतिश परतके , इम्रान शेख पो कॉ . हिम्मत जाधव व गावातील नागरिक उपस्थित होते .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *