ताज्या घडामोडी

पोफाळी : वसंत नगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठीशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास खंदारे यांची फेर निवड.

पोफाळी : वसंत नगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठीशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास खंदारे यांची फेर निवड.

एस के चांद मुख्य संपादक यांची बातमी

पोफाळी : वसंत नगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास खंदारे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी ज्योती खंदारे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी नवनिर्वाचित समितीचे स्वागत मुख्याध्यापक यांनी केले.

वसंत नगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा 31 डिसेंबर 2025 ला शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ पूर्ण झाला, त्यामुळे 13 जानेवारी शुक्रवारला सुहास खंदारे,ज्योती खंदारे,सुजाता खडसे,दीपक नागमोते,संतोष सूर्यवंशी,अनुसया राठोड,आशा हनवते,बाळू देशमुख,विवेक कनवाळे,शेख अतीक या

नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांमधून अध्यक्षपदी सुहास खंदारे यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी ज्योती खंदारे यांची निवड करण्यात आली आहे.

गत्त समितीच्या कार्यकाळात अध्यक्ष म्हणून सुहास खंदारे यांनी शाळेत नवीन प्रयोग राबविले यात सेमी इग्लिशचा नवीन प्रयोग,प्रामुख्याने मुलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा चांगला निर्णय घेतला होता, त्याचबरोबर मुलांच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतल्याने पालकांमधून आणि सदस्यांमधून सुहास खंदारे यांच्या नावाला पसंती देत त्यांची पुन्हा शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित सदस्य आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा सत्कार करण्यात आला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *