ताज्या घडामोडी

ढाणकीच्या शंकरपटात ‘जॉबर-लाडक्या’ जोडीचा थरार; अवघ्या ६.४० सेकंदात मारली बाजी!

ढाणकीच्या शंकरपटात ‘जॉबर-लाडक्या’ जोडीचा थरार; अवघ्या ६.४० सेकंदात मारली बाजी!

​योगेश जाधव यांच्या बैलजोडीने पटकावला ३१,१११ रुपयांचा मान; ‘ब’ गटात चैतन्या तोकलवाड प्रथम

 

​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे

येथील श्री दत्त देवस्थान टेंभेश्वर नगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत (शंकरपट) शिरपूरच्या ‘जॉबर’ आणि ‘लाडक्या’ या बैलजोडीने आपल्या चित्तथरारक वेगाने मैदान मारले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत अवघ्या ६.४० सेकंदात अंतर पार करून या जोडीने ‘अ’ गटामध्ये प्रथम क्रमांक ​शिरपूर येथील बैलजोडी मालक योगेश बाबूसिंग जाधव यांच्या मालकीच्या ‘जॉबर व लाडक्या’ या जोडीने या स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती संभाजीनगर येथील मोरकरी चित्रा उर्फ वैष्णव पोले यांनी ही बैलजोडी पळवली. त्यांच्या अचूक नियोजनामुळे या जोडीने विक्रमी वेळेची नोंद करत ३१,१११ रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानचिन्ह पटकावले. तसेच ‘ब’ गटामध्ये कु. चैतन्या मनोज तोकलवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवत १२,१११ रुपयांचे बक्षीस जिंकले

​स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या मांदियाळीत उत्साहात पार पडला. यावेळी यात्रा कमीटीचे आध्यक्ष हिरासिंह चव्हाण ,किशोर ठाकूर, कृष्णा महाराज, रमन रावते पाटील, अतुल येरावार, सुभाष कुचेरिया, पुरुषोत्तम चिन्नावर, दत्तदिगंबर वानखेडे, बाळासाहेब शहापुरे, स्वप्निल चिकाटे शेख इरफान शेख गुलाब,प्रफुल कोठारी, रामराव गायकवाड, उत्तमराव रावते, निसार पठाण, उमेश योगेवार, प्रवीण धोपटे व नागेश रातोळे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

​शर्यतीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कर्मचारी मोहन चाटे, रवी गीते, जाधव व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत दक्षतेने आपले कर्तव्य बजावले.

​या शंकरपटाच्या यशस्वी नियोजनासाठी पप्पू येरावार, अनिल तोडकर, शिवाजी सुरोशे, सिद्धार्थ गायकवाड, राहुल सोनटक्के ,शुभम गायकवाड व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. हा थरार पाहण्यासाठी परिसरातील हजारो बैलगाडी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *