राजकारण

ढाणकी खऱ्या अनुसूचित जमात उमेदवारांना राजकीय पक्षानी संधी द्यावी !

ढाणकी खऱ्या अनुसूचित जमात उमेदवारांना राजकीय पक्षानी संधी द्यावी !

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे

ढाणकी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवार दि.६ रोजी दुपारी जाहीर झाले असून नगराध्यक्ष पद (SC ) महिला या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तर

प्रभागासाठी अ.जमाती, सर्वसाधारण आणि ना. मा. प्र आरक्षण सुटल्यामुळे बरेच इच्छुक उमेदवार नगरसेवक होण्याचे नशीब अजमावण्यासाठी आपापल्या पक्षकाडे संधी मागत असतात यात पक्ष सुद्धा त्यांच्या जवळील अहार्ता न तपासता यांना संधी देऊन टाकतात. उमेदवाराला अनुसूचित जमाती (ST) साठी आरक्षित जागांसाठी वैध ST जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक असतात. वैधता प्रमाणपत्र नसल्यास उमेदवारी अमान्य होते पण उमेदवार मलाई खाण्यासाठी निवडणुकीनंतर न्यालयात आव्हान देण्याचा डंका वाजवतात आणि कमाई करून जागा रिक्त करून नंतर नागरिकांवर फेर निवडणूक घेण्याचा कर लादतात.असा उमेदवार वैधता प्रमाणपत्र न घेता ST आरक्षणाच्या जागेवरून नगरसेवक म्हणून निवडून आला, तर ते आरक्षण प्रक्रियेचा गैरवापर करत असल्याने. खऱ्या ST उमेदवारांना संधी मिळत नाही.निवडणूक आयोग व कोर्टातून अशा उमेदवाराची उमेदवारी रद्द होते ढाणकीत असे प्रकरणे घडली आहेत ज्यात वैधता नसलेल्या उमेदवारांना निवडणुकीनंतर बरखास्त केले गेले आहे. यामुळे नागरिकांचा विश्वास उडाला असून असा बोगस उमेदवाराला निवडून न देण्याची चर्चा होताना ऐकाला मिळत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *