ताज्या घडामोडी

बांधकाम व इतर कामगारांच्या नोंदणी संदर्भात तालुका नोंदणी केंद्र प्रमुखांचे घेणार समाचार -मनसेचे जिल्हाध्यक्ष.रवि राठोड..!   

बांधकाम व इतर कामगारांच्या नोंदणी संदर्भात तालुका नोंदणी केंद्र प्रमुखांचे घेणार समाचार -मनसेचे जिल्हाध्यक्ष.रवि राठोड..!   

 

माहुर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि : – गणेश राठोड़,शेकापुर

 

 

खरे बांधकाम व इतर कामगार नोंदणीपासून वंचित तालुका स्तरावरील बांधकाम नोंदणी केंद्रावर दलालांचा सुळसुळाट.

तालुक्यात दलाला मार्फत बोगस बांधकाम व इतर कामगारांची बनावट कागदपत्रा च्या आधारे नोंदणी होत असल्याने मूळ कामगार लाभापासून वंचित …

 

माहूर तालुक्यातील प्रभू श्रीराम मंदिर पाचुंदा येथे बैठकीच्या आयोजना दरम्यान बांधकाम कामगाराच्या समस्या मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे बैठकीदरम्यान आश्वासन दिले…

 

बैठकीला शेकडो बांधकाम व इतर कामगार माहूर सह किनवट तालुक्यात मूळ कामगार शासनाच्या लाभापासून वंचित असल्यामुळे बांधकाम कामगार कार्यालयाकडून दलाला मार्फत आर्थिक देवाणघेवाणीतून बोगस मजुरांची नोंदणी केली जात असल्यामुळे मूळ बांधकाम कामगार व इतर कामगारांच्या अधिकार व शासकीय व शैक्षणिक लाभांपासून वंचित असल्याचे त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या निदर्शनात आणून दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष महोदयांनी माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब व कामगार कल्याण उपायुक्त अनिकेत थोरात साहेबांसोबत चर्चा करून खरे वंचित बांधकाम व इतर कामगारांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देऊन मनसे जिल्हाध्यक्ष रवि भाऊ राठोड यांनी कामगाराच्या समस्येसाठी मी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहे कुठलीही अडचण असल्यास मी तुमच्यासोबत आहे असे सांगून कामगारांना बैठकीदरम्यान धीर देऊन नोंदणी करून देण्याची हमी दिली बैठकीदरम्यान माहूर तालुक्याचे कामगार संघटनेचे प्रमुख निळकंठ डालके, चंद्रकांत आढागळे, पंजाब वाठोरे, आकाश मोरे,गणेश साळुंके, विनोद राठोड, गणपत पारडे तसेच मनसेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थित मान्यवर गावाचे पोलीस पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष सह मनसेचे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष राजू पवार, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रवि शेंडे, अनुराग पाटील,अर्जुन,अशील चव्हाण, इतर मनसे सैनिक उपस्थित होते…

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *