ताज्या घडामोडी

महावितरणच्या कनिष्ठ अभियंताला मौजे चोरड येथे पाचारण.  वीज समस्या विशयी मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड ॲक्शन मोडवर .

महावितरणच्या कनिष्ठ अभियंताला मौजे चोरड येथे पाचारण.

वीज समस्या विशयी मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड ॲक्शन मोडवर .

 

श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर.

 

मौजे चोरड येथे वारंवार वीजपुरवठा बाबत गावकऱ्यांची कायमस्वरूपी कमी दाबा सह खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंतासह मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड गावकऱ्यांच्या समक्ष पाहणी दरम्यान मागील 30 ते 35 वर्षाखाली बसवण्यात आलेले रोहित्र (डी.पी)ची अत्यंत दुरवस्था पाहणी दरम्यान दिसून आल्यामुळे त्यावेळेस ची गावातील लोकसंख्या व आजची लोकसंख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आज गावकऱ्यांना विजेच्या अनेक समस्यांना समोर जावं लागत असल्यामुळे गावातील वीजपुरतेसह कृषी पंपाच्या विजेचेही समस्या असल्या कारणामुळे परिणामी शेतकऱ्यांचे पिकांवर होत असलेले परिणाम देखील गंभीर असल्याचे कनिष्ठ अभियंता साहेबांच्या ही सर्व बाबी गावकऱ्यांनी सविस्तर सांगून अभियंता साहेबांना निदर्शनात आणून दिली त्याच वेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड साहेबांनी अभियंतांना सांगून येथे दोन रोहित्र (डी.पी) नवीन प्रस्ताव मंजूर करून बसविण्यात यावे साठी नवीन रोहित्र (डी.पी) बसण्या करिता पाहणी करून स्थळ निश्चित करते वेळेस. दीपक राठोड, रामधन राठोड नाईक, गोकुळ राठोड,नाईक,उत्तम राठोड,निरंजन राठोड,प्रल्हाद चव्हाण,मधुकर पवार, सिताराम पवार,नामदेव चव्हाण,दत्ता आडे, देवीसिंग राठोड,विशाल राठोड, प्रकाश पवार, कुंदन चव्हाण,बाळू चव्हाण, प्रशांत पवार,अंकुश पवार वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

About The Author