आरक्षण योद्धा शहिदांच्या कुटुंबीयांना मदत द्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
{मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड.}
माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर
सकल बंजारा समाजास ST प्रवर्गात समाविष्ट करण्या संदर्भातील मागणी करिता युवकांची आत्महत्या व मोर्चादरम्यान सहभागी व्यक्तींची मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधी व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब या योजनेतून कुटुंबियांना सहानुग्र निधीच्या माध्यमातून मयत च्या कुटुंबियांना प्रति व्यक्ती 50 लाखाची मदतीसह कुटुंबातील एका व्यक्तींना शासन सेवेत सामावून घेण्या करिता विनंती की, बंजारा समाजाच्या ST आरक्षण मागणी संदर्भात आत्महत्या व मोर्चा तील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या 1) पवन गोपीचंद चव्हाण मु. साईनगर ता.उमरगा जि.धाराशिव दिनांक.13 सप्टेंबर 2025
2). बाळराजे चव्हाण मु. भेंडी टाकळी तांडा ता. गेवराई जि. बीड दिनांक. 8 सप्टेंबर 2025 रोजी ची दुर्घटना तरुणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधी व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे या दोन्ही योजनेतून मयताच्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत करून सकल बंजारा समाज व त्यांच्या कुटुंबियांना अनुदाना ची रक्कम अदा करण्यात करिता जिल्हाधिकारी नांदेड मार्फत मुख्यमंत्री महोदयांना दिनांक सप्टेंबर 2025 रोजी. निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड ज्येष्ठ समाजसेवक व समाज प्रबोधनकार रामराव महाराज भाटेगावकर. डी.टी. न्यूज चे मुख्य संपादक विलास जी आडे. दामा राठोड खंबाळकर यांनी उपस्थितीत निवेदन देण्यात आले .




