ताज्या घडामोडी

महागांव / बिडीओ खिलारे यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) येथे भेट.

महागांव / बिडीओ खिलारे यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) येथे भेट.

 

प्रतिनिधी :गोपाल एच राठोड..

पुसद : साई ई जिल्हा परिषद शाळेला भेट पंचायत समितीचे कार्यदक्ष माननीय खिलारे साहेब बीडीओ आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी महागाव प. स. चे गट विकास अधिकारी मा. श्री. विजय खिलारे साहेब यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) येथे भेट दिली. साहेब शाळेत येताच शाळेचे मुख्यमंत्री कु. प्रतीक्षा राठोड आणि सांस्कृतिक मंत्री कु. सावणी चव्हान यांनी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं स्वागत केलं. त्यानंतर साहेबांनी शाळेचा झाडांनी बहरलेला परिसर आणि साफसफाई पाहून समाधान वेक्त केले. लगेच साहेब विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी वर्गात गेले. तेथे त्यांनी मुलांना पाढे , मराठी वाचन, इंग्रजी वाचन तसेच अभ्यासक्रमावर प्रश्न विचारले. पिण्याचे पाणी , शालेय पोषण आहार आणि शौचालयाची पाहणी करून शेवटी कार्यालयात आले. सुसज्ज कार्यालय पाहून आनंद वेक्त केला. ग्रामपंचायत कडून मिळालेल्या साहित्याची विचारपूस केली. संपूर्ण शाळा तसेच शाळेतील विविध उपक्रम याबाबत समाधान वेक्त केले. शेवटी सर्व शिक्षकांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊन पुढील दौऱ्या साठी निघून गेले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *