पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यावर कठोरात कठोर कार्यवाई करा
(जय मल्हार संघटना ढाणकी यांची मागणी)
ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे
समाजात मोठा आदर आणि श्रद्धा असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रमातेबद्दल. सुनील गोपाळराव उभे या इसमाने आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या संदर्भात अत्यंत अश्लील व अपमानास्पद भाषेत बदनामीकारक अपशब्द लिहिल्यामुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे वक्तव्य केवळ कायद्याचे उल्लंघन करणारे नसून, सामाजिक शांततेस आणि एकात्मतेस देखील धोका पोहोचवणारे असून संबधित फेसबुक पोस्ट/कमेंटची चौकशी करून, आवश्यक त्या कायदेशीर तरतुदींनुसार समाजकंटक सुनील गोपाळराव उभे यांच्याविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारची कृत्य करण्यास धजावणार नाही.या प्रकाची मागणी जय मल्हार संघटना ढाणकी यांनी ठाणेदार पांडुरंग शिंदे पोलीस स्टेशन, बिटरगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




