महागाव : बारभाई तांडा ते दरदेववाडी (माळ) पठार हा पाणंद रस्ता खुला करून द्या.नागरिकांनी तहसीलदार यांना दिले निवेदन.
महागाव : तालुक्यातील बारभाई तांडा ते दरदेववाडी (माळ) पठार हा पाणंद रस्ता खुला करून द्या अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे. मागील काही वर्षांपूर्वी ३३ फूट इतका असलेला पाणंद रस्ता आता ५ फुट झाला असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.पाणंद रस्त्याला लागून असलेल्या शेतमालकाने जाणे – येणे अडवले असल्याने आम्हाला पाणंद रस्ता खुला करून द्या अशी मागणी विनोद दुधराम राठोड, बाबुसिंग गुलाब जाधव, दैवता अनिल देशमुख, शुभम गणेशराव देशमुख.पवन आत्माराम राठोड, रोहिदास देवसिंग चव्हाण, सायत्राबाई आत्माराम राठोड, बाली किशोर राठोड, प्रदिप दुधराम राठोड, रमेश कसना राठोड,नागरिकांची मागणी
माणिक अमरसिंग राठोड, पिंटीबाई प्रदिप राठोड, वर्षा विजय पवार, मागीलाल आत्मराम राठोड, हरि गुलाब जाधव, देवकाबाई केशव पवार, केशव तेजु पवार, सुनिल रंगराव देशमुख, देवसिंग सुका चव्हाण, सकु मांगीलाल राठोड सह परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना केली आहे.



