ताज्या घडामोडी

तीव्र पाणीटंचाईने विरोधात आझाद पक्षाचे जलसमाधी आंदोलन (आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध)

तीव्र पाणीटंचाईने विरोधात आझाद पक्षाचे जलसमाधी आंदोलन (आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध)

 

 

ढाणकी – प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.

 

 

ढाणकी नंगरपंचायत मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ढाणकीतील नागरीकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.प प्रशासनाला वारंवार मागणी करूनही पाण्याचा प्रष्न सुटत नसल्यामुळे अखेर आझाद पक्षाच्या कार्यकत्र्यांनी गांजेगाव येथील पैनगंगा नदीपात्रात उतरून दि.04 जुलै 2025 रोजी केले. जलसमद्धे आंदोलन केले,ढाणकी पासून 6 कि.मी अंतर कापत आंदोलक गांजेगाव येथील पैनगंगा नदिपात्रात जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जाॅन्टी विनकरे शेकरू कार्यकर्ते घोषणामध्ये देत नदीपात्रात उतरले, यावेळी माझा समाज पक्षाचे नेतृत्वात देवानंद पाईकराव ,संतोष जोगदंडे,गोलू मुनेष्वर,अतुल वाढवे,पप्पु गायकवाड,प्रफुल दिवेकर ,समाधान राउत,धम्मपाल गायकवाड,विश्णू वाढेकर,गौतम कांबळे, शब्बीर भाई, संतोष गायकवाड, अब्दुल लारा, सचिन वाहुळे,सिमा गायकवाड,पुजा गायकवाड,संगीता घुगरे,लता राउत,कमल विणकरे,छायाबाई वाठोरे,मनिशा भगत,सुरेखा विणकरे,अर्चना मुनेष्वर,पिंकी गायकवाड,कमल विणकरे,रत्नमाला राउत,आरती राउत,चंद्रकला पाचकोरे,षिला गायकवाड,सागर गायकवाड,,इ.कार्यकर्ते महिला व आबाल वृध्दासह मोठया संख्येने नदिपात्रात उतरून न.प.प्रषासनाच्या विरोधात घोशणादेत पाणी टंचाई दुर करण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी लावून धरली.यावेळी बिटरगाव पोलीस स्टेषनचे ठाणेदार पांडूरंग षिंदे हे पोलीस प्रषासनाच्या फौज फाटयासह उपस्थित होते.तसेच उमरखेड तहसीलचे नायब तहसीलदार विष्वासराव राणे,न.प.चे मुख्याधिकारी रविंद्र राउत,पटवारी जगताप,श्री.भंडारे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.आणि लवकरात लवकर पाणी टंचाई निवारण करण्याचे अष्वासन दिले.मात्र अंदोलक जलसमाधी घेण्याच्या मुदयावर ठाम होते.त्यामुळे अंदोलकांने नदी पात्रात उतरून नगर पंचायत प्रषासनाच्या विरोधात जोरदार घोशणाबाजी केली यावर पोलीस प्रषासनाने प्रसंग अवधान राखत नदिपात्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापक पथकाचे कर्मचारी जाॅकेट व रबरी बोट घेवून नदिपात्रात उतरले.त्यांच्या सोबत स्थानिक पोलीस कर्मचारी बिट जमादार सरनाईक,मोहन चाटे,रवि गीते,प्रविन जाधव प्रकाष मुंडे,आंबादास गारोळे,इत्यादी पोलीस कर्मचाÚयांनी अंदोलकांना सुखरूप बाहेर काढले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रषासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान महिला आंदोलकांना नदी पात्रात उतरण्याच्या पवित्रात असतांना पोलीसांनी त्यांना नदीपात्राच्या 50 मिटर अंतरावर रोखले.

मुख्याधिकारी यांनी नदीपात्रात आंदोलन स्थळी यावे अशी मागणी आंदोलकांनी लावून धरल्याने मुख्याधिकारी रविंद्र राउत यांनी पाण्यात उतरून 1 महिन्यात पाणी टंचाई दुर करण्याचे लेखी अष्वासनाचे पत्र दिल्यानंतरच बाहेर आले.

पोलीसांनी अंदोलकांना स्थानबध्द करून ढाणकी पोलीस चैकीत आणले.

चौकट..

नगरपंचायत प्रशासनाने एक महिन्याच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करून या जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले नगरपंचायत आश्वासनाची पूर्तता न केल्यास या पुढचे जलसमाधी आंदोलन सहस्त्रकुंड धबधब्यात करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी

प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे जिल्हाध्यक्ष आजाद समाज पार्टी यवतमाळ.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *