हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे सेनेचा एल्गार.जीआरची केली होळी.
श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड
माहूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्धव गटाच्या शिवसेनेने दि. 29 जून रोजी स. 11 वा. हिंदी भाषेच्या सक्तीच्या जीआरची होळी केली.
राज्यात हिंदी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून शिवसेनेने आक्रमक रूप धारण केले आहे.राज्यभर हिंदी भाषेच्या सक्तीच्या जीआरची होळी करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. त्याला अनुसरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत तालुकाप्रमुख जितू चोले व शहरप्रमुख बालाजी वाघमारे यांचे नेतृत्वात जीआरची होळी करण्यात आली.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे, युवासेना जिल्हा समन्वयक आकाश सातव, तालुका प्रमुख अक्षय वाघ, संदीप गोरडे,गजानन चव्हाण,मंगेश सुकळकर, अभिषेक जयस्वाल,दीपक कांबळे,अरविंद दवणे,वाशीम शेख, कनिष्क वानखेडे,आशीर्वाद आढावे,विनोद मार्गमवार आदी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून राज्य सरकारच्या धोरणाचा विरोध केला.




