ताज्या घडामोडी

माहूरगड येथे राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना स्नेह निमंत्रण

माहूरगड येथे राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना स्नेह निमंत्रण

 

माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड

 

 

माहूरगड महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे माननीय मंत्री नामदार मंगलप्रभातजी लोढा यांना श्रीक्षेत्र माहूरगड येथील आनंद दत्तधाम आश्रम येथे येण्याचे स्नेह निमंत्रण देण्यात आले.

 

साडेतीन शक्तीपीठांपैकी मुख्य शक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे माता रेणुका देवीचे मूळ पीठ असून, याच पवित्र स्थळी दत्त महाराजांचे जन्मस्थान असल्याचे महत्त्व राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी सविस्तरपणे सांगितले.

 

या वेळी महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्यासह नंदू संतान, भाऊराव पाटील हडसणीकर, शेषराव पाटील सर, बबनराव जगाडे, आदित्य धाराशिवकर, ओ.एस.डी. पाठक साहेब, स्वीय सहाय्यक योगेश जोशी, दिवाकरराव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या निमंत्रण प्रसंगी श्रीक्षेत्र माहूरगडच्या पावन भूमीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित करून मंत्री मंगलप्रभात लोढा यांना लवकरच दर्शनासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *