क्राईम डायरी

तरुणीची छेड काढणाऱ्या युवकास केले तात्काळ अटक.

तरुणीची छेड काढणाऱ्या युवकास केले तात्काळ अटक.

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:

 

तरुणीची छेड काढणारा दादाराव जळबा धुळे हा ढाणकी मध्ये टॉवर मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. तो माझा लग्न लावा म्हणून बि. एस. एन एल टॉवर चडून स्टंट करत असतो. पण आता त्याच्या विरोधात मागील काही दिवसापासून तो चक्क नाबालिक मुलीचा पाठलाग करून त्रास देत असल्याची तक्रार दिली असून बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी त्याला तात्काळ अटक केली आहे . तक्रारीवरून

युवक नामे दादाराव जळबा धुळे वय 35 वर्षे राहणार टेंभेश्वर नगर ढाणकी, यांच्या विरोधात पोलीस स्टेशन बिटरगाव येथे अपराध क्रमांक 144/25 कलम 78,79,351(2)(3) भारतीय न्याय संहिता. सह.कलम.12 पोक्सो .अन्वय गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई माननीय. पोलीस अधीक्षक साहेब. कुमार चिंता. अप्पर पोलीस अधीक्षक. पियुष जगताप. उपविभागीय पोलीस अधिकारी. हनुमंत गायकवाड. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे. पोलीस उपनिरीक्षक. सागर अन्नमवार. पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार हे करीत आहे

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *