ताज्या घडामोडी

शेतकरी घरकुल लाभार्थ्यांचे,बँक व्यवस्थापकाकडून पीक कर्ज व बचत खाते होल्ड…..!

शेतकरी घरकुल लाभार्थ्यांचे,बँक व्यवस्थापकाकडून पीक कर्ज व बचत खाते होल्ड…..!

 

 

श्रीक्षेत्र/माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-गणेश राठोड, शेकापूर

 

होल्ड काढण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष,रवि उत्तमराव राठोड यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे कडून शासन दरबारी पाठपुरावा.जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एन पेरणीच्या वेळी कर्ज खाते व बचत खात्यांना

जिल्ह्यातील सर्व बँक शाखा व्यवस्थापकाकडून होल्ड मारण्यात आलेल्या खात्यांना तात्काळ खाते होल्ड काढण्या करिता आदेशित करण्यासाठी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना मनसेचे शिष्ट मंडळ भेट घेऊन

शेतकऱ्यांवर दुमार पेरणीचे संकट असताना देखील ऐन पेरणीच्या वेळी जिल्ह्यातील कार्यरत सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड मारल्यामुळे घरकुल लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना घरकुल बांधकामाचे अनुदान हे शासनाने पंचायत समिती मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला व दुसरा हप्ता जमा करण्यात आला.मात्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकाकडून घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यांना होल्ड करण्यात आल्यामुळे संबंधित बँक व्यवस्थापकाकडे वारंवार जाऊन विनंती करून सुद्धा, संबंधित बँकेचे शाखा व्यवस्थापक हे उडवा उडवी चे उत्तर देऊन “”आधी पीक कर्ज जमा करा नंतरच तुमच्या खात्याचे होल्ड काढण्यात येईल”” अन्यथा काढण्यात येणार नाही. अशा शेतकऱ्यांना धमकी वजा कायद्याचा धाक दाखवून शेतकरी घरकुल लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक अडवणूक करत असलेल्या जिल्ह्यातील सर्व बँक शाखा व्यवस्थापकांना मेहरबान साहेबांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दप्तर दिरंगाई (2006) कायद्याअंतर्गत सर्व बँक शाखा शाखा व्यवस्थापकांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करून जिल्ह्यातील सर्व शेतकरी व घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यांना होल्ड काढून आईन पेरणीच्या वेळी संकटात आणणाऱ्या सर्व बँकांना सक्तीचे आदेश द्यावे.असे मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि उत्तमराव राठोड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *