महागांव : काळी दौ. ते पोखरी मार्गावर अपघाताची मालिका सुरूच.
आठवडाभरात तीन अपघातात सहा जण जखमी.
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी:गोपाल एच.राठोड.
काळी दौलत ते पोखरी मार्गावर रस्ते खोदून बांधकाम सुरू आहे. या खोदलेल्या रस्त्यावर मागील आठवडाभरात तीन अपघात घडले. यात एका चिमुकल्या मुलींसह सहा जण जखमी झाले आहे. रविवार २० एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान काळी ते पोखरी मार्गावर काळी पासून काही अंतरावर पुलाचे बांधकामाकरीता रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात मोहदीवरून काळी कडे जात असताना रात्रीच्या अंधारात खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार खड्ड्यात कोसळुन अपघात घडला. या अपघातात दुचाकी चालक त्याची पत्नी व चार वर्षीय नात जखमी झाली. रात्रीची वेळ असल्याने जखमींना बराच वेळ मदत मिळाली नाही. अखेर त्या माहूर ते पोहरादेवी मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना अपघात घडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती काळी दौलत पोलीस चौकीला दिली.पोलीस कर्मचारी महेश बाबर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी नागरीकांच्या मदतीने तीन्ही जखमींना पोलीस जीपने काळी (दौ) प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचाराकरिता पुसद येथे पाठविले. त्यानंतर दुसरा अपघात गुरुवारी घडला. यात दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. पुन्हा तिसरा अपघात शनिवारी २६ एप्रिल रोजी मोहदी बसस्टँड वर झाला. यात वीज तारसह ईतर साहित्य घेऊन जाणारा टाटा मॅजिक मोहदी बसस्टँड वर पलटी झाला यात दोघं जखमी झाले. रस्त्याचं धुळीचे साम्राज्य कोणत्याही ठेकेदांनी काम सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी वाहनचालकांसाठी फलक नसल्याने सदर वारंवार अपघात घडत असुन वाहनधारक जखमी होत आहे. या कडे संबंधित विभागाने प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक व ईतर सुविधा देण्याची मागणी वाहनचालक करीत आहे.




