ताज्या घडामोडी

जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा साई (ई) शाळेमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा साई (ई) शाळेमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

 

गोपाल राठोड यांची बातमी.

 

आज दि. 24/04/2025 वार गुरुवार रोजी जि.प‍ . शाळा साई (ई) येथे सन -2025-26 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र असणाऱ्या नवागतांचे त्यांच्या घरी जाऊन लेझीम व संगीतमय वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच आजची दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे शाळेसाठी मंजूर झालेल्या बोरवेलला अवघ्या चाळीस फुटावर पाणी लागले.त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आनंद साजरा केला.त्यानंतर सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासाठी जेवनामध्ये मसाले भात.कढी.जिलेबी च्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले.आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावचे सरपंच श्री.गुलाब काका जाधव तसेच ग्रामस्थ पालक यांनी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन व कौतुक केले .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *