ताज्या घडामोडी

ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.

ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.

 

उमरखेड प्रतिनिधी :

ढाणकी येथील गजानन जिल्हावार ते सुभाष वाईनबार पर्यंत झालेला सिमेंट रस्ता हा ठेकेदार ने अतिशय निकृष्ठ दर्जाचा केला असून एकाच महिन्यात त्याची चाळणी झाली आहे.याची तक्रार व दुरुस्तीचे काम करण्यासाठी मागे २३ जानेवारी २०२५ रोजी या संबंधीत नगरपंचायत ला शिवसेना युवासेना यांनी कायदेशिर निवेदन देऊन सुध्दा आज पर्यंत या रोडचे काम झाले नाही ना काम करणारा कंत्राटदार सुद्धा फिरकला नाही, जर हे काम पुन्हा नव्याने बनवले नाही तर शिवसेना युवासेना नगरपंचायत कार्यालयासमोर डफली बजाओ आंदोलन करेल या अश्याचा निवेदन नगरपंचायत ढाणकी मुख्याधिकारी यांना देण्यात आला.यावेळी शिवसेना युवासेना पदाधिकारी संभाजी राजाराम गोरटकर,कांता वासमवार,गजानन अजयगावकर,रविशंकर जमदाडे,शिवाजी फाळके, अभय सोनुने,ऐजास पटेल, बालाजी अलकटवार,प्रफुल गोरटकर,रमेश चिंचोलकर,रमेश होले, गोविंद गौरवाड, गजानन सुरोशे, दिलीप नंदनवार आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *