ढाणकी बिटरगाव : पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार भगत घेत आहेत शहरात प्रतिदिन पेट्रोलिंग,
प्रतिनिधी,ढाणकी :- मिलिंद चिकाटे.
उमरखेड तालुक्यातील ढाणकी,या शहरी रमजान महिन्याच्या पावन आणि पवित्र रमजान ईद बंदोबस्त आणि व्यवस्था तसेच इफ्तार पार्टी सुरू असून येणाऱ्या ईद,राम नवमी उस्तव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार असून ढाणकी शहरात पोलीस प्रशासन द्वारे दररोज पेट्रोलिंग सुरु असून होत असून ढाणकी मधील छोट्या गोष्टीवर लक्ष असून ढाणकी चौकी बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार भगत हे आपल्या कर्मचाऱ्यासोबत शहरात गस्त घालत असून ढाणकी शहरात पूर्णपणे शांती आणि सुव्यवस्था ते सुरळीत चालले असून रमजान महिना व येणाऱ्या रमजान ईद तसेच भीम जयंती आणि विविध सण त्योहार होणार असून पोलीस प्रशासन द्वारे पूर्णपणे बंदोबस्त आणि सुव्यवस्था बाधित ठेवण्याचे कार्य सुरू आहे ढाणकी या शहरात मुस्लिम बांधव रमजान महिन्याचे सर्व कार्यक्रम अति शांततेत पार पाडत असून पोलीस प्रशासनाद्वारे पूर्णपणे शांतता व सुव्यवस्था चे बंदोबस्त केले जात आहे ढाणकी या शहरात सर्व जाती व धर्माचे लोक मिळून राहतात आणि सर्व सन त्योहार हे एका जागी जातीय सलोख्यात पार पाडतात तसेच पोलीस प्रशासन द्वारे इफ्तार पार्टी आणि विविध सामाजिक कार्यक्रम तसेच शांतता कमिटी मीटिंग आयोजन करण्यात येत आहे यावेळी येणारी ईद, रामनवमी उस्तव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हनुमान जयंती शांततेत पार पाडणा बाबत ढाणकी वाशियांना ठाणेदार कैलास भगत यांनी अहव्हाण केले आहे.




