ताज्या घडामोडी

माहूर / रमजान महिन्यात वारंवार महावितरणाच्या ढासाळ कारभारामुळे खंडित वीज पुरवठ्याने मुस्लिम समाज त्रस्त.

माहूर / रमजान महिन्यात वारंवार महावितरणाच्या ढासाळ कारभारामुळे खंडित वीज पुरवठ्याने मुस्लिम समाज त्रस्त.

नांदेड प्रतिनिधी गणेश राठोड.

 

माहूर :- महावितरणाच्या कारभाराचा बेसिस्तीपणा सुधारण्याचे नाव घेत नाही.

वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित ने राहणीमान नकोसे झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात वीजपुरवठा अखंडित ने कळस गाठला आहे. एकीकडे उन्हाचा पारा अर्धशतकीय जवळ पोहोचला. अशा परिस्थितीत महावितरण कडून उन्हाळ्यापूर्वी उपाययोजना करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे आता उन्हाचा पारा वाढल्याने, विजेची मागणी वाढली. परंतु महावितरणाच्या कारभारावर कोणाचेही लक्ष नसल्याने येन उन्हाळ्यात सतत वीज पुरवठा खंडित होत चालला आहे. यावर मात्र अधिकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे नियंत्रण सुटते चालले आहे. अनेक वेळा रीतसर विनंती करून मागणी केल्यानंतरही, वीज परिस्थिती “जैसे थे” असल्याने न्याय कोणाकडे मागावा असा प्रश्न मुस्लिम बांधवासह जनसामान्यातून उपस्थित होत आहे.

 

 

…..महावितरण मुस्लिम विरोधी असल्याचा भास……

माहूर लगत असलेल्या बहुतांश खेड्यात अंदाजे पाच ते सात तास वीज पुरवठा खंडित असल्याचे प्रमाण दरवर्षीप्रमाणे वाढते आहे. वास्तविक पाहता रमजान महिना हा इबादतचा महिना असतो. मात्र महावितरण जाणीवपूर्वक रमजान महिन्यात वीज पुरवठा चार-पाच तास वीज गुल ठेवते. यावरून महावितरण मुस्लिम विरोधी असल्याचा भास समाज बांधवातून वर्तविला जात आहे..

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *