ढाणकी लाईनीच्या लपंडावामुळे नागरिक झाले त्रस्तम हावितरणचा ढसाळ कारभार
ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे.
मार्च महिना लागताच अंगाला लाही लाही करणारा उन्हाचा पारा चढला असून या पारा मुळे जेष्ठ नागरिक घामा घूम होऊन बेजार होत असताना कुलर, फॅन आणि दिवसा झाडाचा आसरा घेत आहे. पण महावितरण ग्राहकांकडून वसुली तर तत्पर घेते तशी तत्पर सेवा पुरवत नसल्याने रात्रीला ढाणकीतील महावितरण च्या ढसाळ कारभारामुळे लाईनीच्या लपंडावाने नागरिक व जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन कामांवर परिणाम होत आहे. ढाणकी मध्ये नागरिक वीज वारंवार जात-येत असल्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या ढसाळ कारभाराबद्दल संताप वाढत आहे.19मार्च रोजी रात्रीला उमरखेड येथील 33kv लाईन वरती तांत्रिक बिघाडामुळे एक ते दीड तास वीज गायब होती तर काल पण याच 33kv लाईन मुळे वीज वारंवार जात-येत असताना,
विजेच्या या खेळीचा फटका घरगुती विद्युत उपकरणांना देखील बसत आहे.
चौकट :
ढाणकी मध्ये पहिले अशीच वारं वार वीज गायब होत असतानी मागील महावितरण ढाणकी अभियंतानी 133kv लाईन कनेक्शन ब्राम्हणगाव या गावातून घेत तोडगा काढला होता. आता सुद्धा ढाणकी ला तेच समस्या सुरु झाली असून
बॅक फिटटींग सप्लाय करण्यासाठी ब्राम्हणगाव, साखरा व फुलसावंगी अश्या तीन गावातून सुविधा असून ढाणकी येथील
कार्यकारी अभियंता यांनी वारं वार वीज गायब होण्याच्या
समस्याचे निवारण करावे असे येथील जानकार नागरिकांचे म्हणणे आहे.




