वानोळा ते मेंडकी रस्त्यासाठी लाखो रुपयांचे मुरूम चोरी प्रकरणी सात दिवस झाले तरी चौकशी नाही.
तलाठी मंडळ अधिकारी यांचे कर्तव्यात कसूर व बेजोदारपणा असल्याने शासनाचे लाखो रुपयाचे महसुलाचे नुकसान
माहूर तालुका प्रतिनिधी गणेश राठोड.
माहूर तालुक्यातील वानोळा ते मेंडकी तीन किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे मोठे काम चालू आहे या कामासाठी मुरूम गोण खनिजांचे केवळ 150 एवढे ब्रास रायल्टी काडण्यात येऊन 2000 ते 3000 ब्रास चे बेकायदेशीर उत्खनन करून गुतेदाराने लाखो रुपयांचे मुरमाची चोरी केली आहे. याप्रकरणी वानोळा सज्जा चे तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कर्तव्यात कसूर व बेजबाबदारपणा असल्याने शासनाचे लाखो रुपये महसूल नुकसान झाले आहे. या प्रकरणी दि 28/02 रोजी लेखी तहसीलदार माहूर,उपविभागीय अधिकारी किनवट, जिल्हाधिकारी नांदेड यांना कळविण्यात आले. माहूरचे तहशिलदार यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिनांक 3 /3 /2025 रोजी दिले. मात्र आज सात दिवस झाले तरी या चोरीच्या मुरमाची चौकशी झाली नाही किंवा संबंधित गुत्तेदारा विरुद्ध दंड लावून कार्यवाही करण्यात आली नाही. एवढा विलंब म्हणजे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचा परिणाम असल्याचे नागरिकांतून ऐकव्यास मिळत आहे याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित गुत्तेदारा वर मुरमाची बेकायदेशीर उत्खनन व चोरी प्रकरणी कारवाई करून लाखो रुपये दंड वसूल करावा आणि यातील कर्तव्यात कसूर करणारे तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे