जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.
नांदेड : गणेश राठोड यांची बातमी.
किनवट-माहूर विधानसभेतील शहर व ग्रामीण भागात नागरिकांचे सेवेकरिता भव्य मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात केले आहे.शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतुन व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई शिवसेना उबाठा किनवट – माहूर विधानसभा व लोककल्याण बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माहूर तालुक्यात रविवार दि.९ मार्च २०२५ रोजी वानोळा ग्राम पंचायत कार्यालय तर सोमवार दि.१० मार्च रोजी माहूर येथील जुने नगर पंचायत कार्यालयात व मगंळवार दि.११ मार्च रोजी वाई बाजार येथील ग्राम पंचायत कार्यालयात सकाळी ९ ते ५ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे.तसेच किनवट तालुक्यात बुधवार दि.१२ मार्च ला संत सेवालाल मंदीर मांडवी,गुरूवार,दि.१३ मार्चला हनुमान मंदीर जवळ, तंटामुक्ती भवण, उमरी बा.व शनिवार, १५ मार्चला ग्राम पंचायत कार्यालय,गोकुंदा किनवट,रविवार दि. १६ मार्च रोजी शिवाजीराजे मंगल कार्यालय, बस स्टैंड जवळ किनवट, सोमवार दि. १७ मार्च रोजी विठ्ठलेश्वर मंदीर, बोधडी बु. मंगळवार दि. १८ मार्च रोजी ग्राम पंचायत कार्यालय, इस्लापुर येथे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य तपासणी तसेच सर्दी, ताप खोकला, सांधेदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, रक्तदाब, रक्त शर्करा, ऐसीडीटी, नेत्र तपासणी त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांचे विकार आदी तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.सदरील शिबिरामध्ये आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करून औषधे मोफत दिली जातील तरी ह्या शिबिराचा किनवट- माहूर विधानसभेतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल रुणवाल, किनवटचे तालुका प्रमुख मारोती दिवसे पाटील, माहूर तालुका प्रमुख उमेश जाधव,किनवटचे शहर प्रमुख प्रशांत कोरडे,माहूर शहर प्रमुख निरधारी जाधव यांचेसह सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना उबाठा किनवट/माहूर तालुका यांनी केले आहे.