उमरखेड मोरचंडी ग्रामपंचायतची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ ! जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांच्या पत्राला केराची टोपली.
प्रतिनिधी ढाणकी: तालूक्यातील मोरचंडी येथील ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे बाबत अनेकदा उपसरपंचाने तक्रारी केल्यानंतर तब्बल चार वेळा चौकशीचे आदेश आले मात्र चौकशीच होत नसल्याने प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात
उपसरपंच अखेर उपोषण करण्याच्या तयारीत आहेत .
मोरचंडी ग्रामपंचायत मध्ये अनेक लाखों रुपयाची कामे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी उपसरपंच प्रमोद राठोड यांनी संबंधीत प्रशासनाला कळविले परंतू तक्रारीवर दि. १६/०१/२०२५ रोजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पं.) जि.प. यतवमाळ यांनी काढलेले चौकशीचे पत्र व
दि. २३/०१/२०२५ रोजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पं.) जि. प यवतमाळ यांनी काढलेले चौकशीचे पत्र दिले होते .त्यानंतर १७ / ०२ / २०२५ व २८ /०२ /२०२५ असे चौकशी समितीला पत्र देण्यात आले होते मात्र एकाही वेळी गठीत समीतीने मोरचंडी येथे भेट दिली नाही. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी मोरचंडी येथील सरपंच/सचिव यांने मोठ्या प्रमाणात केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी करीता एक नव्हे तर चार वेळा चौकशी करीता पत्र पाठविले आहे. तरी आजपर्यंत कोणत्याही कामाची व दप्तराची या ठिकाणी चौकशी होत नाही. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित सरपंच/सचिवावर कार्यवाही करण्यात यावी व उचित कार्यवाहिकरीता अहवाल सादर करावा असे न झाल्यास नाईलाजास्तव आम्हाच्या हक्क आणि न्यायाकरीता आम्हाला अमरण उपोषणास बसावे लागेल. असा इशारा मोरचंडीचे उपसरपंच प्रमोद व्ही. राठोड , ग्रा.पं. सदस्य संगीता झांबरे , योजना पांडे, वनमाला कऱ्हाळे, आशा बाई आहे या पाच ग्रा.पं. सदस्यांनी गावकऱ्या समवेत दिला आहे.
चौकशी समिती गठीत होते परंतू
चार वेळा चौकशी समिती गठीत झाल्यानंतरही आमच्या उमरखेड पं .स . स्तरावर चौकशी समिती ही काम करित नाही .
याला पं .स . गटविकास किरण कोळपे जबाबदार असून चौकशी समिती नेमकी काय करीत आहे हा प्रश्न आम्हा गावकर्यांना पडत असून राजकीय दबावाखाली या लोकशाहीत लोकशाही मार्गाने केलेल्या मागणी केराची टोपली दाखवून एक प्रकारे भ्रष्टचाराला प्रशासनाचे अधिकारी खत पाणी घालत असून आता नाईलाजास्तव आमरण उपोषणास बसावे लागणार आहे .




