क्राईम डायरी

माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी.

माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी.

 

सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्याकडून गाव पुढार्‍यांनी प्रत्येक गावात दारूबंदी करण्याचे आवाहन.

 

माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड.

 

श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे पानोळा येथे येथील प्रतिष्ठित गावकरी महिला आणि सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या अथक प्रयत्नातून शेवटी सर्व गावकऱ्यांनी सभा घेत दारू विक्री बंद दारू पिणे बंद असे बंधन स्वतःहूनच सर्वांनी स्वतःवर लादून घेतल्याने या सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या या अभिनंदनिय उपक्रमाची तालुका भरात चर्चा होत त्यांचे अभिनंदन होत आहे

 

मौजे पानोळा गावात अनेक महिन्यापासून सपोनी शिवप्रकाश मुळे येथील सरपंच रमेश कुडमेथे तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव राठोड पूनीबाई आडे पवन चव्हाण पोहेका प्रकाश गेडाम पोका ज्ञानेश्वर वेलदोडे यांचे सह निर्व्यसनी गावकरी गावात दारू विक्री बंद व्हावी ते हातभट्टीचा हातभट्टीची दारू नागरिकांनी पिणे बंद करावे यासाठी प्रयत्न करत होते शेवटी सर्व गावकऱ्यांनी मिळून सपोनि शिवप्रकाश मुळे यांना गावात बोलावून गावात शंभर टक्के दारू बंद करण्याचा निर्णय घेतला

 

यावेळी गावातील नागरिकांनी शपथ घेऊन गावातील सर्व महिला समक्ष दारू विक्री आणि दारू पिणे बंद करण्याबाबतचे निर्बंध स्वतःहूनच स्वतःवर लादून घेतले यावेळी सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी दारूमुळे होणारे दुष्परिणामांची सखोल माहिती दिल्याने येथील बसलेल्या नागरिकांचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी शपथ घेतल्याने सदरील कार्यक्रमाची तालुका भरत चर्चा झाल्याने सपोनी शिवप्रकाश मुळे यांची दबंग म्हणून ओळख होती ती आता व्यसनमुक्ती सम्राट म्हणून नवीन ओळख निर्माण झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *