क्राईम डायरी

नांदेड / अवैध धंदे अनेक जिल्ह्यातून हद्दपार केले.एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !

नांदेड / अवैध धंदे अनेक जिल्ह्यातून हद्दपार केले.एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !

 

माहूर प्रतिनिधी / गणेश राठोड.

 

मोठ्या विश्वासाने लोक श्रीमान अबीनाश कुमार यांना भेटत आहेत.त्यांना फोन करीत आहेत.

 

साधी राहणी उच्च विचार या म्हणीस तंतोतंत जुळणारे व्यक्तीमत्व म्हणजे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमान अबीनाश कुमार साहेब.

 

ते सन २०१८ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील चांगल्या गुणवतेने उत्तीर्ण झालेले पोलीस अधिकारी आहेत.

 

त्यांना डीआयजी श्रीमान शहाजी उमाप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तथा धडाकेबाज कारवाईसाठी सुप्रसिद्ध असलेले श्रीमान सूरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक (आयपीएस) श्रीमती किर्थीका मॅम, नक्षलप्रवण क्षेत्रात आपला ठसा ऊमटविणारे डीवायएसपी श्रीमान सुशील कुमार नायक व काही जांबाज पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची साथ लाभली आहे.

 

ते अत्यंत कर्तव्यदक्ष व प्रेमळ अधिकारी आहेत.

त्यांनी कधीही कसल्याही प्रकारची तडजोड केली नाही.

किंबहुना पदभार स्वीकारताच त्यांनी अवैध धंदे जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत.

गुन्हेगारांमध्ये धडकी तर सामान्य नागरिकांचा विश्वास संपदान करण्यास त्यांना खुपच कमी वेळात यश आले आहे.

त्यांनी शासकीय दवाखान्यात झालेल्या निष्काळजी पणाबद्दल व बालकांच्या मृत्यू संदर्भाने थेट गुन्हे दाखल केल्याने तेव्हा त्यांची राज्यभर चांगलीच चर्चा झाली होती.

 

त्यांनी पदभार स्वीकारताच आपल्या ध्येर्यशाली कर्तव्याची चुणूक दाखविण्यास सुरवात केली.

कोम्बिंग ऑपरेशन व ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत त्यांनी अनेक सराईत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध केले.

 

शकडो रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची सामूहिक बैठक घेऊन सुधारण्याची संधी दिली.

बहुतेक अशी प्रक्रिया राबविणारे ते पहिलेच पोलीस अधीक्षक असावेत.

आता तर थेट त्यांनी उप मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या पुर्व संध्येला दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत वाळू माफीयांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले.

बहुतांश वाळू माफिया हे राजकीय क्षेत्राशी संबंधित आणि समाजात प्रतिष्ठित वक्तीमत्व म्हणून वावरणारे पुढारी आहेत.

 

काहीजण तर चमकोगिरीसाठी शस्त्र परवाना काढून मिरविणारे शस्त्र परवाना धारक असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

दि.६ फेब्रुवारी रोजी एसपी.अबीनाश कुमार हे सकाळी पाच वाजल्यापासून ते आपल्या पथकासह पेनूर – वाहेगाव कडे निघाले आणि त्यांनी अनेक रेती घाटावर मोठी कारवाई केली.चार चाकी गाडी पोहचू शकत नाही अशा रस्त्याने त्यांनी दुचाकी द्वारे सहकारी कर्मचाऱ्या सोबत प्रवास केला.

 

त्यांनी दोन नंबर वाल्या वाळू माफियांचे होत्याचे नव्हते केले.

या धडक कारवाईत त्यांनी १६ डिझेल पंप, ६० तराफे, एक जेशीबी आणि २०० ब्रास अवैध साठा करून ठेवलेली वाळू जप्त केली.

त्यांनी केलेली कार्यवाही ही महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून केलेली मोठी कारवाई आहे.नांदेड जिल्ह्यात सद्यातरी एस.पी.अबीनाश कुमार, बस्स…नाम ही काफी हैं !अशीच चर्चा सुरु आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *