नांदेड /आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे पत्रकार दिन साजरा.
tv9माझा लाईव्ह न्युज संस्थापक अध्यक्ष शेख चांद सर होते.
यवतमाळ प्रतिनिधी – पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन टीव्ही 9 माझा लाईव्ह न्युज च्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टीव्ही 9 माझा लाईव्ह न्युज संस्थापक अध्यक्ष शेख चांद सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार अंबादास भोपी पाटील रेणूका देवी संस्थान माजी विश्र्वस्थ अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती नांदेड जील्हा अध्यक्ष विनोद भारती विजय गवारे सुदेश मुक्कावार भवानिदास भोपीं पाटील पुजारी रेणूका देवी संस्थान व सम्पूर्ण श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सेवेकरी माहूरगड उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील योगदानावर प्रकाश टाकला.
शेख चांद सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेला नवा आयाम दिला. त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा आजच्या पत्रकारांनी घ्यावी.”
या वेळी, अज़िज खान,व मिलिंद चिकाटे, लतीफ शेख, गणेश राठोड, गोपाल राठोड, यांना पत्रकारितेत “उत्कृष्ट पत्रकारिता” उल्लेखनीय कामगिरी केल्या बदल प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी, स्थानिक पत्रकारांनी देखील आपल्या अनुभवांचा आदान-प्रदान केला. पत्रकारितेच्या आव्हानांवर चर्चा करताना पत्रकारांनी समाजातील अन्याय दूर करण्यासाठी माध्यमांनी अधिक सक्रिय भूमिका बजावावी, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आदी पत्रकार उपस्थित होते,
कार्यक्रमात अज़िज खान, मिलिंद चिकाटे व गोपालं राठोड यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, लतीफ शेख यांनी केले, प्रास्ताविक भाषण तर आभार प्रदर्शन गणेश राठोड यांनी केले.
कार्यक्रमास स्थानिक नागरिक, पत्रकार, विद्यार्थी व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते,