उमरखेड / बहुजन मुक्ती पार्टी द्वारे इं.विद्वान केवटे यांनी भव्य नामांकन रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला.
उमरखेड – मिलिंद चिकाटे यांची बातमी
बहुजन मुक्ती पार्टी द्वारे, तथा जरांगे पाटलांचे इच्छुक उमेदवार म्हणून,उमरखेड 82 विधानसभेत,
इंजि.विद्वानभाऊ केवटे यांनी भव्य नामांकन रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला.
यावेळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ह्या रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते नारायणराव पाटील वानखेडे,जननायक बिरसा मुंडा,राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून या रॅलीची सांगता तहसील कार्यालय उमरखेड येथे झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी यांना विद्वान केवटे यांनी अर्ज दिला त्यावेळी चक्रधर पाटील देवसरकर,डॉ. शीवकांत भवर, वर्षाताई देवसरकर,ऋषिकेश देवसरकर हे उपस्थित होते.
यावेळी हजारोंच्या संख्येने रॅलीत सहभागी असलेले नागरिक स्वतःच्या घरची आणलेली भाजी भाकरी घेऊन स्वाभिमानाने खाताना दिसले. यावेळी “ज्वारीच्या धांड्याला मक्याची कनसं आम्ही नाही आणली भाड्याची माणसं,” हा नारा सर्वत्र
या रॅलिमध्ये आकर्षणाचा विषय ठरला.
अठरापगड जाती धर्मातील 20 संघटनांनी यावेळी या रॅलीमध्ये सहभागी होऊन समर्थन जाहीर केले.
या आगळ्या वेगळ्या रॅलीची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.