महागांव/करंजी येथे पोलिसांनी सापळा रचून मोह फुलाच्या गावठी अड्ड्यावर टाकला छापा
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव
पोलीस स्टेशन महागाव अंतर्गत करंजी येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाद्वारे गावठी दारू गाळप होत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार महागांव पोलिसांनी सापळा रचून आज दि. २५/१०/२०२४रोजी पन्नास हजाराच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना आले यश
गेल्या अनेक वर्षापासून करंजी शेत शिवारातील पोहंडूळ गावाकडे जाणाऱ्या कॅनॉलच्या बाजूला जवळपास असलेल्या ठिकाणी मोहफुल माचाची गावठी भट्टी चालू असलेल्या ठिकाणची महागांव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. करंजी परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू गाळप व विक्री होत असल्याने अनेक तरुण या गावठी दारू च्या आहारी गेली आहे. गावठी दारू मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत होते. दारू गाळप गळप करून विक्री करणाऱ्यांची मोठी हिम्मत वाढली होती. परिणामी या ठिकाणी सहज दारू उपलब्ध होत आहे . या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांत दारू पिणाऱ्याच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी गावात नेहमीच यांन त्या कारणावरून भानगडी निर्माण होत होत होत्या. महागाव पोलिसांनी सापळा रचून घटना स्थळ गाठले. पोहंडूळ गावाकडे जाणाऱ्या कॅनलचे बाजूला असलेल्या झाडाझुडपाची पंचा समक्ष पाहणी केली. यावेळी येथील झोपडी मध्ये प्लॅस्टिक कॅन मध्ये 50 लिटर गावठी दारू आणि तेराशे पन्नास लिटर गावठी मोहफुलाचा सडवा माच असा एकूण 52 हजार 250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले . गावठी दारू व मोहफुलाचा सडवा मोहफुल रसायन जागीच नष्ट करण्यात आले. आरोपी ज्ञानेश्वर मोतीराम राठोड वय 38 वर्षे रा. करंजी ता. महागाव याचे विरुद्ध महागाव पोलीस स्टेशन मध्ये दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकाटे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, सहाय्यक फौजदार मारुती मुनेश्वर, पोलीस कॉन्स्टेबल अमित नोळे यांच्या टीमने केली आहे.