उमरखेड / विडूळ येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी.
ढाणकी प्रतिनिधी.
महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात शांततेत पार पडली आदिवासी कोळी महादेव समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सर्व लहान थोर महिला वृद्ध सहभागी झाले होते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नियोजित मंदिराच्या जागेवर प्रतिमेचे पूजन करून समाजातील ज्येष्ठ नागरिक नीलकंठ खंडू जिनेवाड यांच्या हस्ते पूजन होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली अतिशय आनंदाने गावातील सर्व समाज बांधवांची उपस्थिती यामध्ये होती यामध्ये महिलांचा अतिशय आनंदाने सहभाग दिसून आला मिरवणूक शांततेने पार पडली मिरवणूक गावातून फिरून परत ऋषीच्या मंदिरात आल्यावर या ठिकाणी प्रतिमेची आरती करण्यात आली व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील महिलांचा तरुणांचा महत्त्वाचा सहभाग होता यामध्ये शिवाजी बोईनवाड सतीश तीगलवार अमोल बिछेवाड श्रावण मामीलवाड बाळा कोठेवाड माधव काचेवार सुभाष कृपवाड विलास नागरपवाड गणेश मामीलवाड अंकुश जंगीपल्लेवाड नवनाथ पालेवाड नितीन नागरपवाड अंबादास नागरपवाड या सर्व समाज बांधवांचा सहभाग होता महर्षी वाल्मिक यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली