उमरखेड महागांव विधानसभा.दत्तात्रय गंगासागर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार!
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव
गेली अनेक वर्षापासून उमरखेड तालुक्यातील दत्तात्रय गंगासागर हे राष्ट्रवादी काँग्रेस सच्चे कार्यकर्ते म्हणून काम करत होते .राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने त्यांनी शरद पवार गटांशी सतत ते एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून राहिले . महागाव उमरखेड तालुक्यातील बंदी भाग मत खंडात सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला असून त्यांचा मोठा चाहता वर्ग मतदारसंघात आहे.
महागाव उमरखेड तालुक्यातील बंदी भाग व मतखंडात सामाजिक कार्यात मोठा सहभाग असून त्यांचा दांडगा चाहतावर्ग वाढल्याने त्यांना मोठा प्रतिसादही मिळणार असल्याचे बोलल्या जाते. ते सतत दहा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. मागील दहा वर्षापासून ते उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथील ते भूमिपुत्र आहेत. त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून शासकीय सेवेत अभियंता म्हणून कार्य करीत असताना जनतेचे लोकोपयोगी अनेक प्रश्न मार्गी लावले. त्याचीच पावती म्हणून त्यांच्या पाठीशी उत्तम जनाधार उभा आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती हा मतदारसंघ सुटलेला आहे. उमरखेड महागाव विधानसभेची जागा महाविकास आघाडी या घटक पक्षातील काँग्रेस या पक्षाच्या वाट्याला उमेदवारी मिळाल्यास यावेळी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते दत्ता गंगासागर यांनी आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचे उमरखेड येथे होऊ घातलेल्या या पत्रकार परिषदेत जिल्हा.ओ. बी.सी सेलचे अध्यक्ष भास्कर पंडागळे. महागाव तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख. आबासाहेब देशमुख. विशाल पवार. सुशील राऊत. व इतर पदाधिकारी उपस्थित होते परंतु गंगासागर यांनी बंडखोरी केल्यास आम्ही त्यांचे सोबत जाणार नाही आमच्यासाठी पक्षाचा आदेश महत्त्वाचे असल्याने आघाडी धर्म पाळू असे पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले