संयुक्त पत्रकार बहुद्देशी संस्था उमरखेड व यूट्यूब व डिजिटल मीडिया चे पत्रकार व साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमरखेड आयोगाकडे केली तक्रार
जिल्हा संपादक एस के शब्बीर
उमरखेड शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांवर दुजाभाव करणाऱ्या उमरखेड येथील शासकीय माहीती अधिकारी गजानन परटके यांची हाकालपट्टी करण्याची मागणी ग्रामीण व शहरी पत्रकारांनी केली आहे.
उमरखेड तालुक्यातील माहीती अधिकारी गजानन .परटके हे पत्रकारामध्ये दुजाभाव करून आपल्या मर्जीतील पत्रकारांना मिटींगला बोलवतात त्यामुळे ते ज्या पत्रकारांना ते बोलवीत नाही त्या पत्रकारांना विविध माहिती पासून वंचित राहावे लागत आहे . पत्रकार हा पत्रकार असतो, माहिती अधिकारी यांनी येथील सर्व पत्रकारांना त्यांची कडील माहिती देणे कर्मप्राप्त आहे परंतु संबंधित अधिकारी हे ज्या विशिष्ट पत्रकार सोबत ओली पार्टी करतात त्याच पत्रकारांना माहिती देऊन इतरांना कोणत्या हेतूने माहिती देण्याचे टाळतात हे समजत नाही.
संबंधित अधिकारी हे पत्रकार मंडळी तर्फे करण्यात येत असलेल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून तातडीने बदलीची कारवाई करावी अशी मागणी संयुक्त पत्रकार बहुद्देशीय संस्था उमरखेड चे वतीने करण्यात आली मागणी पूर्ण न झाल्यास संयुक्त पत्रकार संघ व साप्ताहिक युट्युब डिजिटल मीडिया ग्रामीण पत्रकार मिळून रस्त्यावर सज्ज असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना देण्यात आलेल्या निवेदनातून दिली आहे. यावेळी संयुक्त बहुउद्देशीय पत्रकार संस्था उमरखेड चे शेख इरफान, रितेश पाटील कदम, सुरेंद्रनाथ दळवी, गजानन वानखेडे, सय्यद रहीम रजा अवधूत खडककर, स्वप्निल मगरे, ज्ञानेश्वर लोखंडे, शेख तहसीन, सय्यद खाजाभाई, शुद्धोधन दिवेकर, प्रभाकर पाईकराव, बबलू भालेराव, मुजीब लाला, फिरोज लाला, सुनील ठाकरे, सिद्धार्थ दिवेकर तसेच डॉक्टर आंबेजोगाई कर यांचे सह बरीच पत्रकार मंडळी उपस्थित होते.