ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यातील महिलांची पंचायत समितीवर धडक.घरकुला पासून वंचित ठेवल्याचा आरोप 

महागांव तालुक्यातील महिलांची पंचायत समितीवर धडक.घरकुला पासून वंचित ठेवल्याचा आरोप

 

प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर

 

 

महागांव तालुक्यातील आमणी, काळी, भोसा, टेंभी, वरोडी, काळी दौ येथील महिलांनी घरकुलापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत पंचायत समितीवर धडक दिली. या गावात घरकुलाची यादी अतिशय बोगस पद्धतीने देण्यात आली असून गोरगरीब, विधवा महिलांना हक्काच्या घरकुलापासून ग्रामपंचायत सरपंच, सचिव व संबंधितांनी वंचित ठेवण्याचा आरोप महिलांनी केला आहे. तसेच गावामध्ये जे नागरीक अतिक्रमण करून वास्तव्यात आहेत त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला ज्यांना शेती, राहण्यासाठी मजबूत घर आहे अशा नागरिकांना घरकुल देण्यात आले व गरजू नागरिकांना वंचित ठेवण्यात आले. असा संताप्त महिलेंनी आरोप केला आहे. ग्रामविकास यंत्रणेने कुठल्याही प्रकारची चौकशी न करता टेबलावर बसून लिस्ट जाहीर केली का ? असा प्रश्न संतप्त महिलेने केला असून गरजू नागरिकांना, विधवा महिलांना घरकुलाचा लाभ द्या अशी मागणी केली आहे.

 

 

ज्या नागरिकांना घरकुलाची आवश्यकता नव्हती अशा नागरिकांना घरकुल मंजूर झाले असून आम्ही घरकुलापासून वंचित राहिलो आहोत. या सर्व बाबीची तात्काळ चौकशी करून आम्हाला घरकुल द्या अशी मागणी तालुक्यातील संतप्त महिलांनी केली आहे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असाही इशारा महिलेंनी दिला आहे.

 

 

या सर्व बाबींची तात्काळ सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वर कडक कार्यवाही करावी. ग्रामविकास यंत्रने सह सर्व यंत्रणेची चौकशी करणे गरजेचे आहे. इरफान सय्यद – सामाजिक कार्यकर्ते काळी दौ.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *