महागांव /घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच सचिवाकडुन पैश्याची मागणी.
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव
(पेढी ईजारा येथील नागरीकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार)
महागाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पेढी ईजारा या गावातील एकाला घरकुल चा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व सचिवांनी पैश्याची मागणी केल्याने सदर ईसमानी याची तक्रार मंगळवारी जिल्हाधिकारी कडे केली आहे. तालुक्यात मौजा मौजा पेढी ईजारा येथील रहिवासी दत्ता रंगराव वटाणे हे भुमीहीन शेतमजुर आहे, ते पेढी येथील समाज मंदिरात राहत असून त्यांच्या कडे स्वतःचे घर नाही. केवळ खूली जागा आहे. त्यांनी घरकुल मिळण्याकरीता अर्ज केला मात्र सरपंच व सचिव यांनी टारगेटमध्ये बसविण्यासाठी वीस हजार रुपयाची मागणी केली घरकुलाच्या मिळणाऱ्या अनुदान रक्कमेतून सदरची रक्कम आम्हाला द्या तरच तुमचे घरकुल मंजुर करतो. रक्कम न दिल्यास तुला घरकुल देणार नाही असे तक्रारीत म्हटले आहे तसेच घरकुल यादीमध्ये क्र. १४ ते ४९ क्रमांकामध्ये फक्त ९ लाभार्थी खरे असून बाकी सर्वांचे पक्के आर.सी.सी बांधकाम असलेले घर आहे. त्यामुळे न जिल्हाधिकारी यांनी याची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी व नमुना ८ पाहून घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी दत्ता रंगराव वटाणे यांनी जिल्हाधिकारी कडे निवेदनाद्वारे केली आहे




