महागांव/भारतीय स्टेट बँकेत ११० गावांच्या समावेश ग्राहकांनसाठी सुविधांचा अभाव पिण्यासाठी पाणीच नाही.
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव
महागाव येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये असंख्य तालुक्यातील दिव्यांग नागरिक या ठिकाणी आपला आर्थिक व्यवहार करण्यासाठी येत असतात या बँकेमध्ये आजपर्यंत शाखा व्यवस्थापकाने कोणत्याही प्रकारच्या नागरिकांच्या सुख सुविधांसाठी या ठिकाणी सोय करून ठेवलेली नाही. या ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही.
दिव्यांग व्यक्तीसाठी या ठिकाणी बँकेत जाण्यासाठी रॅम नाही. दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी कुठलाही कर्मचारी सहकार्य केलेले दिसत नाही.
या ठिकाणी बाहेर उभे राहण्यासाठी कुठल्याही प्रकारची ग्राहकांना व्यवस्था केलेली दिसत नाही त्याच्यामुळे उन्हाताना पावसात याचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे ग्राहक शाखा व्यवस्थापकांनी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध कराव्या अशी नागरिकांची मागणी आहे.